Home Breaking News धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचा केला ‘गर्भपात’

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचा केला ‘गर्भपात’

1609

अत्याचार करणारा अटकेत

पीडितेच्या घरा शेजारी राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेतला. तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात करण्यात आला. तक्रारीअंती पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या युवकास अटक केली आहे.

Img 20250422 wa0027

पंकज गंगाधर लाकडे (26) असे अत्याचारी युवकाचे नाव आहे. तो शहरातील एका परिसरात वास्तव्यास आहे. याच परिसरात त्याच्या घरा शेजारी अल्पवयीन मुलगी राहते. तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याने तिला प्रमाच्या जाळल्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत लैंगिक शोषण केले.

Img 20250103 Wa0009

सण 2019 पासून तिचे शोषण होत होते यामध्ये त्या बलिकेला गर्भधारणा झाली होती. पंकज ने तिचा गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मार्गावर असलेल्या एका नगरीत निर्जन स्थळी त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.

प्रकरण अंगलट येत असल्याने पंकज ने “तो मी नव्हेच” ची भूमिका घेतली. त्यामुळे पीडितेच्या पालकांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.
वणी: बातमीदार