Home Breaking News निकेत गुप्ता रोटरी क्लबच्या ‘अध्यक्षपदी’

निकेत गुप्ता रोटरी क्लबच्या ‘अध्यक्षपदी’

405

पदग्रहण सोहळा उत्साहात

वणी: रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी चा पदग्रहण सोहऴा एस. बी. हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी नवनियुक्त अध्यक्षपदी निकेत गुप्ता व सचिव लवलेश लाल यांना कॉलर पिन देऊन पदभार देण्यात आला.

Img 20250422 wa0027

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रोटरी 3030 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीनिवास लेले, असिस्टेंट गवर्नर राहुल सराफ, प्रतिष्ठित व्यवसायीक विजय चोरडिया उपस्थित होते. रोटरी क्लब चे नवनियुक्त अध्यक्ष निकेत गुप्ता, नवनियुक्त सचिव लवलेश लाल, यांना मावळते अध्यक्ष विनोद खुराना यांनी कॉलर पिन देऊन पदभार दिला.

Img 20250103 Wa0009

प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी च्या कार्यांची प्रशंसा केली. समाजकार्यात ही संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. असिस्टेंट गवर्नर राहुल सराफ यानी रोटरी 3030 चे डिस्ट्रिक्ट गर्वनर डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या संदेशाचे वाचन केले.

यावेळी निखिल केडिया, अंकुश जैस्वाल, अनिल उतरवार, संदीप जैस्वाल, अरुण कावडकर, आशीष गुप्ता, धवन अग्रवाल, परेश पटेल, असलम चीनी, सुनील चिंडालीया, अचल जोबनपुत्रा, मयूर गेडाम, मयूर अग्रवाल, शाहबुद्दीन अजानी, हिमांशु बत्रा, राजेश राठी, अंकुश भंडारी, रुद्र टाटेवार, श्रेयस निखार, शुभम मदान, गौरव जोबनपुत्रा, संजय छाजेड व सर्व रोटरी चे सदस्य व त्यांचे कुटुंब उपस्थित होते.
वणी: बातमीदार

Previous articleवणीत 5 सप्टेंबरला “आजादी की दौड”
Next articleभरधाव दुचाकीस्वार अपघातात ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.