● नागपूर येथे उपचारादरम्यान निधन
वणी | पुसद येथे वास्तव्यास असलेल्या 58 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका तथा एबीपी माझा चे अँकर सौरभ कोरटकर यांच्या मातोश्री उषाताई (पाठक)कोरटकर यांचे गुरुवार दि. 15 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

पुसद येथील संगीत विशारद संजय कोरटकर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत्या. त्या सुद्धा शिक्षिका होत्या, त्यांनी पुसद तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय, जांब बाजार येथे आपले कर्तव्य बजावले. नुकत्याच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांना कवेत घेतले आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
सुस्वभावी, हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे पुसद शहरात शोककळा पसरली असून त्यांचेवर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
वणी: बातमीदार