Home Breaking News बकरा कपायचा सुरा हाती घेवून जीवे मारण्याची धमकी

बकरा कपायचा सुरा हाती घेवून जीवे मारण्याची धमकी

1325

● आरोग्य निरीक्षकाची पोलिसात तक्रार
● अतिक्रमण काढताना घडली घटना

वणी: जत्रा मैदान परिसरात रहदारीस अडथळा होत असल्याने रस्त्यावरील मटण विक्रेत्याला सुचनापत्र देण्यात आले होते. मात्र त्याने दुकान हटवले नाही म्हणून दि 22 जून ला दुपारी चार वाजता पालिकेच्या पथकाने दुकान हटविण्यास सांगितले. यामुळे क्रोधीत 35 वर्षीय मटण विक्रेत्याने बकरे कापायचे हत्यार हातात घेवून प्रभारी आरोग्य निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

Img 20250422 wa0027

रोशन बाळू लोणारे (35) असे गुन्हा नोंद झालेल्या मटण विक्रेत्यांचे नाव आहे. तो काळे ले आउट, मध्ये वास्तव्यास असून जत्रा मैदान परिसरात बकरे,मास विक्रीचा व्यवसाय करतो. आठवडी बाजार व यात्रा मैदानातील मास विक्रेत्यांनी आरक्षित जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचे पथक कारवाई करत होते. सिमेंट कॉक्रीट रोडच्या माध्यभागी लोणारे यांनी मटण विक्रीचे दुकान थाटले होते.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी नगर पालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद अतिक्रमण हटाव पथकासह जत्रा मैदानातील अतिक्रमण काढत होते. तत्पूर्वी त्या अतिक्रमण धारकांना सुचनापत्र देण्यात आले होते. बुधवारी दुपारी रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुकान काढण्याचा सूचना देताच मटण विक्रेता बकरा कपायचा सुरा हातात घेवून ताराचंद यांच्या अंगावर धावून आला आणि जीवे मारण्याची व दुकानाला हात लावल्यास तुला कापुन फेकतो अशी धमकी दिली.

या प्रकरणी पालिकेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षकाने गुरुवारी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारीच्या प्रतिलिपी पाठवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी मटण विक्रेता रोशन लोणारे याचे विरोधात भादंवि कलम 294, 186, 506 नुसार गुन्हा गुरुवारी मध्यरात्री दाखल केला आहे.
वणी: बातमीदार