Home Breaking News बापरे …जिनिंग मालकाला अकरा लाखांनी ‘फसवले’

बापरे …जिनिंग मालकाला अकरा लाखांनी ‘फसवले’

1155

राजस्थानच्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

वणी: निळापूर- ब्रांम्हणी मार्गावर साईकृपा कॉट जिन प्रा.लि. हे जिनिंग आहे. या जिनातून राजस्थान येथील व्यापाऱ्याला सरकी- ढेप विकण्यात आली होती. सदर व्यापारी उर्वरित 11 लाख 57 हजार 725 रुपये देण्यास टाळाटाळ करत असल्याने जिनिंग मालकाच्या तक्रारीवरून दि.22 फेब्रुवारी ला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Img 20250422 wa0027

सुरेशकुमार रणजितसिंह चाहर (50) रा. निराधुन ता. मलसीसर जि. झुनझुन (राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. साईकृपा कॉट जिनचे संचालक सुनील कातकडे यांनी सुरेशकुमार ला 14 जून 2018 पर्यंत 2 हजार 371 क्विंटल सरकी- ढेप 1 हजार 625 रुपये बाजारभाव प्रमाणे विक्री केली होती.

Img 20250103 Wa0009

कातकडे यांना सरकी- ढेप च्या मोबदल्यात व्यापाऱ्यांकडून 38 लाख 52 हजार 759 रुपये घेणे होते. व्यापाऱ्याने वारंवार कातकडे यांच्या बँक खात्यात 26 लाख 95 हजार 30 रुपये जमा केले. उर्वरित 11 लाख 57 हजार 725 रुपयांची कातकडे यांनी अनेकदा मागणी केली मात्र त्या व्यापाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

दिलेल्या मालाची रक्कम मिळत नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सुनील कातकडे यांनी विस्तृत माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना सांगितली. याप्रकरणी कातकडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
वणी: बातमीदार