Home Breaking News भन्नाट…. दिडशे रुपयांत धावणार तिनशे किलोमिटर ‘कार’

भन्नाट…. दिडशे रुपयांत धावणार तिनशे किलोमिटर ‘कार’

2527

शेतकरी पुञांने बनवली स्वयंचलित ‘सोनिक कार’

वणीः आजकालचे सुशिक्षीत युवक आपल्‍या संकल्पनेतून नवनविन प्रयोग करतांना दिसत आहे. तर अनेक तरुण यशस्‍वी झाले आहेत, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पहाता सध्‍या शेतकऱ्यांसाठी नवनविन प्रयोग केल्‍या जात आहे. अशाच वणीतील एका उच्‍च शिक्षीत शेतकरीपुञाने अवघ्‍या दिडशे रुपयांत अडीचशे ते तिनशे किलोमिटरचा प्रवास करणारी स्‍वयंचलीत “सोनिक कार” तयार केली आहे.

Img 20250422 wa0027

हर्षल नक्षिणे असे उच्‍च शिक्षीत व प्रयोगशील युवकांचे नांव आहे. तो सर्वसाधारण कुटूंबाशी निगडीत असुन त्‍याने एमटेक ची पदवी प्राप्‍त केली आहे. काहीतरी नविन करण्‍याचा ध्‍यास उराशी बाळगुन त्‍याने कमी खर्चात धावणारी कार निर्माण करण्‍याचा निर्णय घेतला. वणी परिसर हा प्रदुषणग्रस्‍त म्‍हणुन ओळखल्‍या जातो. त्‍यात डिझल व पेट्रोलवर धावणारी वाहने अधिक भर घालत आहे. त्‍यामुळे प्रदुषण विरहीत कार तयार करण्‍याचा निश्‍चय केला.

Img 20250103 Wa0009

हर्षलने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची अशी सुपरकार असली पाहिजे. जी शून्य प्रदूषण करते आणि स्वत: धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी होती. म्हणूनच वणी येथील हर्षल नक्षणे नामक युवकाने आपल्या कुणाल आसुटकर या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे.

हर्षल नक्षणे याने एक कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आपल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे. ड्रायव्हरविना ही कार चालणार आहे. आपल्याला ज्या मार्गाने व ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग निवडा त्या ठिकाणी ही कार पोहचणार आहे.

एक लिटर हायट्रोजन (किंमत 150 रुपये) मध्ये 250 ते 300 किलो मिटर धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे. या कारने कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही. ही सुपर कार तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग वणीतच तयार केले आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले.

प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिंसटमचे पॅटेट नोंदणी केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. सामान्य लोकांना ही कार परवडेल, यासाठी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

लहानपणापासुनच प्रदुषण विरहित कार बनविण्‍याचे माझे स्‍वप्‍न होते. यातुनच मला हायड्रोजनवर चालणारी गाडी निर्माण करण्‍याचा निर्णय घेतला. तब्‍बल एक वर्षाच्‍या कालावधीत ही कार तयार करण्‍यात आली. या कार बाबत केंद्रिय मंञी नितीन गडकरी यांची भेट घेतली असता त्‍यांनी या कारच्‍या उत्‍पादनाकरीता मदत करण्‍याचे आश्‍वस्‍त केले आहे.
हर्षल नक्षिणे
प्रयोगशिल युवक