Home Breaking News भरधाव कारचा भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी

भरधाव कारचा भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी

यवतमाळ मार्गावर घडली घटना

रोखठोक | वणी शहरातील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभ होता. वरात आणण्यासाठी चारचाकी वाहनातून जात असलेले वाहन निंबाळा शिवारात अज्ञात वाहनाला मागून भिडले. यात कार मधील तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार दि 27 मार्चला रात्री 8:45 वाजताच्या सुमारास घडली.

संदीप लटारी सातपुते (28) राहणार मैसदोडका, प्रतीक नामदेव पुसदेकर (27) राहणार कुंभा व राकेश भुसारी (22) हा नरसाळा येथील तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ते कार क्रमांक MH- 29 -V-2990. या वाहनातून नरसाळा येथे वरात आणण्यासाठी जात होते.

वरात आणायला जात असलेले वाहन भरधाव वेगात असताना वाहन चालकाला समोर जात असलेल्या वाहनाचा अंदाज आला नाही आणि ते मागून भिडले.या अपघातात कार चक्कनाचूर झाली तर तिघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरील नागरिकांनी कार मधील जखमींना तातडीने उपचारार्थ वणीतील रुग्णालयात हलवले व पोलिसांना सूचित केले आहे.

Img 20250103 Wa0009

निंबाळा शिवारात झालेल्या अपघातात संदीपच्या डोक्याला तर प्रतीकच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.
वणी : बातमीदार