● वाहतूक सेनेची संघटनात्मक बांधणी
रोखठोक | शिवसेना पक्ष दुभंगल्या नंतर दोन्ही बाजूने संघटना बांधणीकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर गजेंद्र घरात तर यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर प्रशांत चंदनखेडे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष आली भाई यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.

जिल्हा तसेच वणी उपविभागात वाहतूकदार, वाहन चालक यांच्या अनेक समस्या आहेत. वाहतूकदारांवर होणारे अन्याय व त्यांच्या समस्या सोडवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी येथील तडफदार कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. त्या प्रमाणेच हा परिसर औद्योगिक क्षेत्रात मोडत असल्याने वाहतुकदारांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
वाहतूकदारांच्या न्याय व हक्कासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत तसेच इतरही समस्या सोडविण्यात पुढाकार घ्यावा हा उद्देश ठेऊन राज्य उपाध्यक्ष पदावर गजेंद्र घरात यांची तर यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर प्रशांत चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आली भाई यांच्या आदेशानुसार शिवशक्ती वाहतूक सेना सरचिटणीस म्हणून मी सैय्यद रब्बानी चिश्ती यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. घरात व चंदनखेडे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
वणी : बातमीदार