Home Breaking News धक्कादायक… ललित लांजेवार यांचे निधन

धक्कादायक… ललित लांजेवार यांचे निधन

● होतकरू तरुण नेता हरपला

C1 20250130 00273136

होतकरू तरुण नेता हरपला

Sad News | अतिशय धक्कादायक घटना आज शहरात घडली. शिवसेनेचे शहर प्रमुख, धडाडीचा कार्यकर्ता, सुखदुःखात धावून जाणारा युवा नेता ललित लांजेवार यांचा हृदय विकाराच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक 29 जानेवारीला रात्री घडली. Lalit Lanjewar died of cardiac arrest

ललित लांजेवार वय अंदाजे 43 वर्ष, हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख होते. ते स्वतः आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. दररोज व्यायाम आणि नीट नेटका आहार घेणारे होते. बुधवारी सायंकाळी त्यांना छातीत कळ येत असल्याने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना त्याचवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

ललित लांजेवार सारखा होतकरू तरुण व युवा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण शहरात कमालीची शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, लहान मुले व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वदूर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009