Home Breaking News वणीतील युवकाचा नागपुरात आढळला ‘मृतदेह’…!

वणीतील युवकाचा नागपुरात आढळला ‘मृतदेह’…!

541

ओळख पटविण्यासाठी पोलीस सज्ज

वणी : नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोराडी परिसरातील रेल्वे रुळालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात मिळालेल्या विड्रॉल स्लिपच्या पावती वरून ओळख पटविण्यासाठी नागपूर पोलिसांनी मृतकाचे छायाचित्र व माहिती वणी पोलिसांना सांगितली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे.

Img 20250422 wa0027

शहरातील जुने कॉटन मार्केट परिसरात वास्तव्यास असलेला युवक रेल्वे सायडिंग वर कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. दि. 8 मार्चला तो नेहमी प्रमाणे कर्तव्यावर गेला मात्र तो तेव्हा पासून घरी परतला नाही.

Img 20250103 Wa0009

बुधवारी कोरडी परिसरातील रेल्वे रुळालगत एक अज्ञात मृतदेह आढळून आला. लकडगंज पोलिसांनी प्राथमिक तपास आरंभलेला असताना मृतकाच्या खिशात दहा हजार रुपयांची ATM मधून निघालेली स्लिप आढळली त्यावर असलेल्या नावावरून तो युवक वणीतील असल्याची खात्री पोलिसांना झाली.

लकडगंज पोलिसांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे वणी पोलिसांनी त्या संशयित मृतकाच्या परिवारासोबत संपर्क साधला. त्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संशयित मृतकाचा भाऊ नागपूर ला रवाना झाला आहे.
वणी: बातमीदार