● अंजली व नंदिनी ने जिंकली प्रेक्षकांची मने
रोखठोक |:– नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वणी येथे श्री रंगनाथस्वामी संगीत कला केंद्र, ईगल सोशल ग्रुप व श्री साई म्युझिकल ग्रुप च्या वतीने विदर्भ आयडॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्व.पंडित रामगोपालजी जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत वडकीचा विजय चांदेकर अव्वल ठरला.

बाजोरिया लॉन येथे या गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यातील 60 दिग्गज गायकांनी सहभाग घेतला होता. माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार, प्रा स्वानंद पुंड, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
● अंजली व नंदिनीच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध ●
इंडियन आयडॉल फेम असलेली अंजली गायकवाड व मराठी संगीत सम्राट पुरस्कार प्राप्त नंदिनी गायकवाड यांनी आपली कला प्रेक्षकां समोर सादर केली.मराठी व हिंदी गीत सादर करून प्रेक्षकांची मने जींकली.
सिनियर व ज्युनिअर अशा दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी एक हसीना थी एक दिवाना था, सत्यम शिवम सुंदरम, ये है रेशमी जुल्फा का अंधरा, माई तेरी चुनरीया लहराई, ऐ मेरे दोस्त लोट के आजा, तूम मिले दिल खिले, निशाना तुला दिसला ना, अशा ऐकापेक्षा एक बहारदार गीत सादर करून स्पर्धेची रंगत वाढवली.
इंडियन आयडॉल फेम अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड व त्याचे वडील अंगद गायकवाड यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सिनियर गटात वडकीच्या विजय चांदेकर याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत विदर्भ आयडॉल चा किताब पटकाविला. तर द्वितीय स्थानी ऋषभ लोनबळे- हिंगणघाट, वासूदेव धाबेकर- कळंब हे राहिले सुरेंद्र डोंगरे -हिंगणघाट व समीक्षा हटवार- वर्धा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला,
ज्युनियर गटात यवतमाळ च्या स्वरा लाड ने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर नागपूर चा आयुष्य मानकर दुसऱ्या स्थानी राहिला, तर बाभूळगाव ची कृष्णप्रिया घोटेकर ने तिसरा क्रमांक प्राप्त केला. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार विश्वास नांदेकर, वरोरा येथील नगराध्यक्ष अहेते श्याम अली, संजय खाडे, जमीर खान, शेखर वांढरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संगीत क्षेत्रात दिलेल्या अविरत योगदाना बद्दल राजाभाऊ बिलोरिया, नायब तहसीलदार विवेक पांडे व अंगद गायकवाड यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. यशस्वीतेसाठी श्री रंगनाथस्वामी संगीत कला केंद्र, ईगल सोशल ग्रुप व श्री साई म्युझिकल ग्रुपच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
वणी : बातमीदार