Home Breaking News विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

813

पुनवट येथील घटना

वणी: तालुक्यातील पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने गुरुवार दि. 17 फेब्रुवारी ला सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले असता वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

Img 20250422 wa0027

रामकृष्ण नानाजी सुर (40) असे मृतकाचे नाव असून ते आपल्या परिवारासह पुनवट येथे वास्तव्यास होते. त्यांचे आईच्या नावे 3 एकर शेतजमीन आहे त्यावर तसेच रोजमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घरातील मंडळींची नजर चुकवून त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. याबाबत घरच्यांना कळताच त्याला तातडीने उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून घरातील आधारवड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार