● घोन्सा येथे शोककळा, साश्रुनयनाने अंत्यसंस्कार
Sad News | तालुक्यातील घोन्सा येथे वास्तव्यास असलेल्या नागपुरे कुटूंबावर काळाची वक्रदृष्टी पडली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुचाकीवर स्वार आजी-आजोबासह चिमुकलीचा भिषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भद्रावती जवळ मगंळवार दिनांक 31 डिसेंबरला राञी 9 वाजताच्या दरम्यान घडली. A child along with grandparents died in a tragic accident.
सतीश भाउराव नागपुरे (51), मंजुषा सतीश नागपुरे (46) व मायरा राहुल नागपुरे (02) असे मृतकांचे नांव आहे. हे सर्व घोन्सा येथील रहिवाशी आहेत. घटनेच्या दिवशी सायंकाळी आपल्या दुचाकीवर घोन्सा येथुन ते भद्रावती येथे वास्तव्यास असलेल्या साडभावा कडे नववर्षाला भरणाऱ्या यात्रा निमित्ताने गेले होते.
चंद्रपुर -वरोरा मार्गावर साडभावाचा धाबा आहे तिथे जेवन्याचा बेत आखुन राञी 8 वाजता तिघे धाब्यावर पोहचले. जेवण आटोपून घरी परतण्यासाठी दुचाकीने जात होते. एका ठिकाणी डिव्हायडर क्रॉस करत असतांना भरधाव ट्रकने त्यांना जबर धडक दिली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकलीचा उपचारादरम्यान राञी उशीरा मृत्यू झाला.
ही घटना भद्रावती पोलीसांना कळताच त्यांनी पंचनामा केला व जखमी चिमुकलीला उपचारार्थ हलवले. तसेच
मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवले. बुधवारी दुपारी त्यांचेवर घोन्सा येथे साश्रुनायनाने तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घडलेल्या घटनेने संपुर्ण गावात कमालीची शोककळा पसरली आहे.
Rokhthok News






