● वणी- वरोरा मार्गावरील घटना
Sad News | भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली या घटनेत 29 वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. हा भिषण अपघात वणी वरोरा मार्गावरीला संविधान चौकात बुधवार दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 10 30 वाजता झाला. A 29-year-old youth died on the spot in the incident where the truck hit the bike.

गणेश हरिश्चंद्र बदकी (29) असे मृतकाचे नांव आहे तो मारेगांव येथील निवासी होता. काही कामानिमित्य तो चंद्रपुर येथे गेला होता, तो आपल्या दुचाकी क्रमांक MH-29-AB-1563 ने गावी परतत असतांना येथील संविधान चौकात ट्रक क्रमांक CG- 04- PH-0520 ने दुचाकीला जबर धडक दिली यात गणेशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडताच प्रत्यक्षदर्शीनी पोलीसांना सुचित केले, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेतील ट्रक चालक हा वाहनासह पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News