● सुसाईड नोट मधून होणार आत्महत्येचा पर्दाफाश
Sad News | यवतमाळ शहरातील नामांकित महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाने रेल्वेखाली स्वतःला झोकून आपले आयुष्य संपवले. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहल्याचे कळत असून त्यात नेमकं काय दडलंय हे तपसांती कळणार आहे. परंतु एका उच्च शिक्षित प्राध्यापकाने टोकाचा निर्णय का घेतला हे न उलगडणारे कोडे आहे. Alas, the professor nearly died by throwing himself under the rail
प्रा. संतोष गोरे (50) असे मृतकाचे नाव आहे ते श्रृष्टी अपार्टमेंट रेवती हॉटेलच्या मागे यवतमाळ येथे वास्तव्यास होते. ते लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी स्वतःला संपवले, हे कळू शकते मात्र त्यांनी लिहिलेल्या सुसाईड न मध्ये आत्महत्येस कारणीभूत कोण हे तपसांती स्पष्ठ होणार आहे.
प्रा. गोरे हे ‘आप्पा’ या टोपन नावाने परिचित असून, त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Rokhthok New






