● सव्वा पाच किलो गांजा जप्त
Crime News Pandharkavada : पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे बस स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. संशयीत तरुणाला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याचे जवळ तब्बल पाच किलो 209 ग्राम वजनाचा गांजा मिळुन आला. ही कारवाई मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारीला दुपारी करण्यात आली. Based on the confidential information received by the police, a trap was laid in the bus stand area.

शेख जावेद शेख साबीर (30) रा. नफीज मौलाना यांचे घराजवळ, वार्ड क्रमांक 26बढी मस्जीद लालखडी, अमरावती असे ताब्यातील गांजा तस्कराचे नांव आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांना गोपनिय बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम पांढरकवडा बस स्थानक परिसरात गांजा विक्री करीता आणत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदारांनी याप्रकरणी वरिष्ठांसोबत कारवाईच्या दृष्टीकोणातुन चर्चा केली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद, व निरीक्षक वैद्य मापन शास्त्र विभाग, पांढरकवडा यांचे सोबत एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत कार्यवाही करणे संबंधाने पत्र व्यवहार केला.
पोलीसांनी बस स्थानक ते स्टेडीयमकडे जाणारे रोडवरील गुरू माउली मेडीकल समोरील वारंगा खिचडी ठेल्याजवळ सापळा रचला. प्राप्त टिपच्या आधारे संशयीताला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. गांजा तस्कर काळया रंगाचे जॅकीट परिधान करुन होता. ते काढून बघीतले असता त्याने पोटाला पांढऱ्या रंगाचे कापड दोरीच्या साहयाने गुंडाळलेले होते. त्यात प्लॅस्टीकची मोठी पन्नी व आतमध्ये गांजा सारखे ओलसर अंमली पदार्थ भरून असल्याचे आढळुन आले.
याकारवाईत 31 हजार 254 रुपये किमतीचा पाच किलो 209 ग्राम गांजा मिळुन आला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, SDPO रामेश्वर वेंजने यांचे मार्गदर्शनात PI दिनेश झांबरे, CO ज्ञानेश सोनावाने न.प. पांढरकवडा, वजनमापे तांत्रीक दुरूस्तीकार बासीत अतहर शेख जहांगीर, PSI योगेश रंधे, नितीन सुशीर, पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर, शरद शिवणकर, सचिन काकडे, राजु बेलयवार, राजु मुत्यालवार, छंदक मनवर, विजय राठोड, कमलेश काकडे यांनी केली.
Rokhthok News