Home Breaking News गोवंशाच्या हाडा-मासाचा भयंकर मोठा साठा

गोवंशाच्या हाडा-मासाचा भयंकर मोठा साठा

● कत्तलखान्यात शेकडो गोवंशाची कत्तल ● रस्त्यावर आढळले गोवंशाचे मुंडके

2077
C1 20250112 08123068

कत्तलखान्यात शेकडो गोवंशाची कत्तल
रस्त्यावर आढळले गोवंशाचे मुंडके

Wani News | शनिवार दिनांक 11 जानेवारीला सायंकाळी दीपक चौपाटी परिसरातील रस्त्यावर दोन गोवंशाचे धडावेगळे मुंडके व मांस आढळले. या घटनेने प्रचंड खळबळ माजली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये या करिता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात सर्च ऑपरेशन राबवले असता एका गोदामात गोवंशाच्या हाडा-मासाचा भयंकर मोठा साठा आढळून आला. An awfully large stock of beef bones and meat

Img 20250422 wa0027

वणी शहरात मागील अनेक वर्षांपासून गोवंशाची कत्तल होत असल्याचे वास्तव या घटनेने उजागर झाले आहे. दीपक चौपाटी परिसरातील झाडा झुडपाने वेढलेल्या भागात कत्तलखाने थाटण्यात आले आहे. उपयुक्त मांस वापरात आणून वेस्टेज मटेरियलची तेथेच साठवणूक करण्यात येत होती. ही बाब पालिका प्रशासन व पोलिसांना कळू नये हा संशोधनाचा विषय आहे.

Img 20250103 Wa0009

चौपाटी परिसरात रस्त्यावर गोवंशाचे मुंडके आढळल्याने रामनवमी समितीचे कार्यकर्ते, युवासेना, शिवसेना शिंदे व ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, बजरंग दल, व भाजपचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. नागरिकांची व बघ्यांची गर्दी वाढत असल्याने sdpo गणेश किंद्रे यांनी पोलिसबळ वाढवले.

आ. देरकर आक्रमक, कारवाईचे निर्देश
रात्री उशिरा आमदार संजय देरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कत्तलखान्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा जाब विचारला. तसेच रात्रीच हाडा-मांसाची विल्हेवाट का लावण्यात येत आहे असा प्रतिप्रश्न उपस्थित करत विस्तृत चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावे व म्होरक्या पासून सर्वानाच अटक करावी अशा सूचना प्रशासनाला केल्या.

पोलीस प्रशासन सतर्क
शनिवारी उघडकीस आलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करून आरोपींच्या अटकेसाठी पथके तयार केली आहे. कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेतल्याजात आहे.
Rokhthok News