● अखेर देरकरांनी स्वतःला सिद्ध केले
Political News | संपूर्ण राज्यात महायुतीने कहर केलेला असताना वणी विधानसभेत मविआचे उमेदवार संजय देरकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला. सुरुवाती पासूनच देरकरांनी निवडणूक जिंकायचीच असा पवित्रा अवलंबला होता. मतदारसंघात लाडकी बहीण रुसल्याचे दिसत असून मशाल चांगलीच पेटली आहे. या निवडणुकीत देरकरांनी स्वतःला सिद्ध केले आहे. In Zanjawat… beloved sister Rusli, the torch was lit
राज्यात महायुतीने चांगलीच मजल मारली, सर्वत्र भगवे वादळ घोंगवले आणि मविआला जबर फटका बसला. वणी विधानसभेत शिवसेनेची ताकद नेमकी काय आहे हे यावेळी दिसून आले असले तरी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण पक्ष मविआच्या पाठीशी उभा केल्याने देरकरांचे पारडे जड झाले.
मतमोजणी मध्ये पहिल्या फेरी पासून देरकरांनी आघाडी घेतली, मारेगाव, वणी शहर व तालुका तर झरी तालुक्यात आघाडी टिकवून ठेवली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवल्यानंतर देरकरांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत टिळक चौकात मोठी गर्दी केली. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते विजयी मिरवणुकीकरिता सज्ज झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी करत असतानाच विजयी घोषणांनी आसमंत दणाणून गेला.
Rokhthok News






