Home Breaking News Big breaking….बाजारपेठेतील ‘सुविधा’ कापड केंद्राला भीषण ‘आग’

Big breaking….बाजारपेठेतील ‘सुविधा’ कापड केंद्राला भीषण ‘आग’

2360

● कोट्यवधी रुपयांचे नुकसान,

वणी :- शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या प्रसिद्ध सुविधा कापड केंद्र दुकानाला रात्री 2 वाजताचे सुमारास भीषण आग लागली. यात तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Img 20250422 wa0027

गांधी चौकातील मुख्य बाजार पेठेत प्रवीण गुंडावार यांचे सुविधा कापड केंद्र आहे. रात्री दोन वाजताच्या सुमारास या दुकानाला भीषण आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.

Img 20250103 Wa0009

पाहता पाहता सर्व दुकान आगीने आपल्या कवेत घेतले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र आग आटोक्यात आली नव्हती. शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तीन ते चार कोटी चे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वणी: बातमीदार