● नांदेपेऱ्याजवळ घडली घटना
Sad News | दुचाकीने आपल्या गावी परतत असताना भीषण अपघात झाला. या घटनेत वनोजा येथील 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघडकीस आली. A terrible accident occurred while returning to his village on a two-wheeler.
सचिन मधुकर मडावी (38) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो वनोजा देवी येथील निवासी होता तर एसटी महामंडळात नोकरीला होता. आपले काम आटोपून तो रात्रीच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH 34 AC 9424 ने गावी परतत होता. नांदेपेऱ्याजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्डयात पडला.

घडलेल्या अपघातात त्याचे डोक्याला जबर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत तो तेथेच पडून राहिला, अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास लावण्यात येत आहे. ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले मात्र. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News