Home Breaking News गोवारी माईन्स मध्ये अवैध ब्लास्टिंग

गोवारी माईन्स मध्ये अवैध ब्लास्टिंग

*त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा..

*संजय निखाडे यांची मागणी

वणी बातमीदार: शासनाच्या नियमाला तिलांजली देत ACC गोवारी माईन्स मध्ये गुरुवारी सायंकाळी अवैध “ब्लास्टिंग” करण्यात आली. सदर वर्तन नियमबाह्य असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी उप विभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.

Img 20250103 Wa0009

शिंदोला परिसरातील ACC गोवारी माईन्स येथे सतत होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे गोवारी गावातीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील घरांना तडे गेलेले आहेत. त्याप्रमाणेच ACC गोवारी माईन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन चालू आहे. शासनाच्या महसूलचे गबन अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे. वारंवार अवैध उत्खनना बाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. पण अजूनपर्यंत त्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी 7.45 वाजता अवैधरित्या ब्लास्टिंग करण्यात आली. रहदारीच्या मार्गावर दगडाचा खच पडला आहे. ब्लास्टिंग बाबत शासनाने नियम ठरवून दिले आहेत. ब्लास्टिंग ची काही बंधने कंपनीला आहेत. दुपारी 12.30 ते 1.30 व दुपारी 3.30 ते 4.30 वाजता ब्लास्टिंग च्या वेळा ठरवून दिलेल्या असताना ACC कंपनी चे मुजोर अधिकारी खुलेआम नियमाला तिलांजली देत असल्याचा आरोप निवेदनातून निखाडे यांनी केला आहे.

खनिकर्म अधिकाऱ्या मार्फत या माईन्स ची सखोल चौकशी करण्यात यावी व अवैध उत्खनन करणाऱ्या ACC गोवारी माईन्स च्या अधिकाऱ्यांवर तसेच ब्लास्टिंगशी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच  अधिकाऱ्यांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि माईन्स ची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत माईन्स बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleत्या..खड्डयात बसून करणार आंदोलन
Next articleत्या…आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.