Home Breaking News अंध दाम्‍पत्‍य कलागुणांच्‍या साहयाने ‘आत्‍मनिर्भर’

अंध दाम्‍पत्‍य कलागुणांच्‍या साहयाने ‘आत्‍मनिर्भर’

● जुने हिंदी गाणे गात कमवतात हजारो रुपये

1250

जुने हिंदी गाणे गात कमवतात हजारो रुपये

Wani news | जन्‍मतः अंध असणारे दाम्‍पत्‍य आपल्‍या अपंगत्‍वावर मात करत आपली कला जेव्‍हा सादर करतात तेव्‍हा त्‍यांचे लाजवाब गीत ऐकणारे स्‍तब्‍ध होतात. कोणताही बडेजाव न करता चौकात करावोकेच्‍या माध्‍यमातुन जुने हिंदी गीत गाणारे आहेत आंध्रप्रदेशातील दाम्‍पत्‍य. प्रेक्षक स्‍व: इच्‍छेने जे पैसे देतील ते स्विकारत असुन महिन्‍याला हजारो रुपये कमवतात. बेरोजगारी असल्‍याचे जे ओरडतात त्‍यांच्‍या डोळयात झणझणीत अंजन घालणारे हे जीवंत उदाहरण आहे. This is a living example of a twinkle in the eye of those who cry about unemployment.

Img 20250422 wa0027

सुरेल आवाजात जुने हिंदी गीत गाणारे दाम्‍पत्‍य आहेत आंध्रप्रदेशातील विजयवाडा जिल्‍हयातील ओंगल येथील. त्‍यांनी अमरावती,  वरोरा,  यवतमाळ,  गोंदिया,  चंद्रपुर अशा अनेक शहरातील चौकात उभे राहुन आपली कला सादर केली आहे. मदतीचा एक डब्‍बा व करावोके चा बॉक्‍स हेच त्‍यांचे उपजिवीकेचे साधन झाले आहे.

Img 20250103 Wa0009

“जो वादा किया ओ निभाना पडेगा”…”अजीब दास्‍तां है ये..” हे हिंदी गीत ते गातात तेव्हा ऐकणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकतात. अप्रतीम आवाजात आपली दर्दभरी दास्‍तान ते हिंदी फिल्‍मी गीतांतुन गात असल्‍याने प्रेक्षक मंञमुग्‍ध झाल्‍याचे दिसून येत आहे. उदरनिर्वाह करण्‍यासाठी त्‍यांनी आपल्‍या कलेलाच व्‍यवहारीक जोड दिली आहे. भीक मागण्‍यापेक्षा आत्‍मनिर्भर कसे व्‍हावे हे या दाम्‍पत्‍याच्‍या गुणांनी अधोरेखीत होत आहे.

लक्ष्‍मण बोगापुरम (32) व अनुराधा बोगापुरम (29) असे त्‍या अंध दाम्‍पत्‍यांचे नावे आहेत. दोघेही जन्‍मतः अंध आहेत. दोनाचे चार हात झाल्‍यानंतर उपजिवीका कशी करावी या विवंचणेत ते असतांनाच त्‍यांनी आपल्‍या कलेला प्रेक्षकांसमोर सादर करण्‍याचे ठरवले. ते अंध असुन सुध्‍दा कोणत्‍याही संघटनेशी जुळले नाहीत. आज ते दर दिवशी सरासरी दोन ते तीन हजार रुपये कमवत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
Rokhthok News