● बोपापुर आणि धूनकी येथील घटना
Sad News | लहानसहान बाबीवरून टोकाचा निर्णय घेण्याची वृत्ती वाढत चालली आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धूनकी येथील 50 वर्षीय व्यक्तीने तर मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोपापुर येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय इसमाने विष प्राशन करून जीवन संपवले. दोन दिवसात दोघांनी आपले जीवन संपवल्याने शोककळा पसरली आहे. As both of them ended their lives within two days, mourning has spread.
शंकर अनंतराव मेश्राम (50) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह धुनकी येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री तो घरी परतला आणि विष प्राशन केले. विषाची मात्रा जास्त झाल्याने तो अंगणातच मृत्युमुखी पडला. ही बाब पहाटे घरच्या मंडळींना कळताच त्यांनी पोलिसांना कळवले.
सुनील शत्रुघ्न पेंदोर (40) राहणार बोपापुर या व्यक्तीने शनिवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन केले. ही बाब त्याच्या भावाला कळताच त्याने हंबरडा फोडला. प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दोघांची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून शव नातेवाईकांना सोपवण्यात आले आहे.
Rokhthok News






