Home Breaking News पुन्‍हा आत्‍महत्‍या… महिलेने घेतला गळफास

पुन्‍हा आत्‍महत्‍या… महिलेने घेतला गळफास

● उप विभागात आत्‍महत्‍येचे सञ सुरुच

1636

उप विभागात आत्‍महत्‍येचे सञ सुरुच

Sad News Maregaon | तालुक्‍यात तसेच उप विभागात आत्‍महत्‍येचे सञ सुरुच आहे. दररोज होणारा आत्‍मघात चिंतनीय आहे. मारेगांव तालुक्‍यातील बोटोणी येथे 32 वर्षीय घटस्‍फोटीत महिलेने गळफास लावून आपले जीवन संपवल्‍याची घटना गुरुवार दिनांक 10 ऑगष्‍टला सकाळी उघडकीस आली. A 32-year-old woman hanged herself at Botoni in Maregaon taluka.

Img 20250601 wa0036

रत्‍ना वसंतराव वरखेडे (32) असे मृतक महिलेचे नांव आहे. ती आपल्‍या पतीपासुन विभक्‍त्त झाल्‍यामुळे एका सात वर्षीय मुलीसह माहेरीच बोटोणी येथे वास्‍तव्‍यास होती. घटनेच्‍या दिवशी तिचे वडील शेतात गेले होते तर आई बाजुच्‍या खोलीत होती याचा तीने फायदा घेत गळफास लावला व जीवनयाञा संपवली.

Img 20250103 Wa0009

याप्रकरणी कुटूंबियांनी मारेगांव पोलीसांना सुचित केले आहे. पोलीसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, पुढील तपास मारेगांव पोलीस करताहेत. मृतक रत्‍ना हिच्‍या पश्चात एक मुलगी, आई- वडील, चार बहिणी व एक भाऊ आहे.
Rokhthok News