● तीन दिवसांपासून धगधगतेय आग
● आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश
● आग लगने के बाद सन्नाटा क्यो है भाई ?
● बघा आगीचा संपूर्ण व्हिडीओ..!
Wani News | यवतमाळ मार्गावरील एका पेट्रोल पंप च्या मागील बाजूस एफसीआय ची मालकी असलेल्या कोल डेपोत साठवणूक केलेला हजारो टन कोळसा तीन दिवसांपासून धगधगतेय. संपूर्ण कोलडेपो आगीच्या विळख्यात सापडला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात कोलडेपो धारकाला अपयश आले असून “आग लगने के बाद सन्नाटा क्यो है भाई ?” यामुळे संशय बळावत चाललाय. Coal depot fire, thousands of tons of coal ash

लालपुलिया परिसरात मोठया प्रमाणात कोलडेपो थाटण्यात आले आहे. कोळसा खाणीतून उत्खनन झालेल्या कोळशाची साठवणूक कोलडेपोत करण्यात येते आणि त्या कोळशाचे वितरण संपूर्ण देशात करण्यात येते. उमरेड भागातील कोळशाची साठवणूक एफसीआय (फ्युल कॉर्पोरेशन इंडिया लि.) च्या कोळसा डेपो वर करण्यात आल्याचे बोलल्या जात असून हजारो टन कोळसा येथे साठवला होता.

यवतमाळ मार्गावरील रिलायंस पेट्रोलपंप च्या मागील बाजूला एफसीआय (FCI) चा कोलडेपो आहे. होळीच्या दिवशी साठवणूक केलेल्या कोळशाला आग लागली. आग चांगलीच धुमसत होती, यात एक मशीन सुद्धा जाळून खाक झाली. टिप्पर च्या माध्यमातून कोळसा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले. या आगीत अंदाजे दहा हजार टन कोळसा राख झाल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News