Home Breaking News कोळसा खाणीचे कामकाज ठप्‍प, करोडो रुपयांचे नुकसान

कोळसा खाणीचे कामकाज ठप्‍प, करोडो रुपयांचे नुकसान

● बोर्डे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा आक्रमक ● हिलटॉप भाजपाच्‍या रडारवर

C1 20240223 13195777

बोर्डे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा आक्रमक
हिलटॉप भाजपाच्‍या रडारवर

Wani News : वेकोलीच्‍या कोलारपिंपरी कोळसा खाणीत दिनांक 21 फेब्रुवारी पासुन भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष तथा माजी नगराध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्‍या नेतृत्‍वात हिलटॉप कंपनीच्‍या बेबंदशाही विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तर कामगारांसह कामबंद आंदोलनाचे अस्‍ञ उगारले आहे. अदयाप कोणताही तोडगा निघाला नसल्‍याने वेकोलीचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. Under the leadership of Tarendra Borde, BJP has become aggressive against the abandonment of Hilltop Company.

Img 20250103 Wa0009

हिलटॉप ही वाहतुक कंपनी सातत्‍याने वादाच्‍या भोवऱ्यात अडकतांना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी इंडस्‍ट्रीयल वापरांकरीता असलेल्‍या बायो डिझल प्रकरणी पोलीसांनी कारवाई सुध्‍दा केली होती. तर अनेक कामे नियमबाहय करत असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे. त्‍यातच भुमिपुञांना न्याय देण्‍यात कंपनी प्रशासन टाळाटाळ करताहेत.

हिलटॉप कंपनीने वेकोलीशी केलेल्‍या कराराचा भंग केल्‍याचा आरोप करत भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी काम बंद आंदोलनाचे हत्‍यार उगारले आहे. कोलारपिंपरी कोळसा खाणीत कार्यरत असलेल्‍या हिलटॉप कंपनीला वेकोलीचे वरीष्‍ठ अधिकारी पाठीशी घालत असुन मागील दोन महीन्‍यांपासुन कामगारांच्या न्यायहक्कांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मात्र कंपनी प्रशासन कुठलीच दखल घ्‍यायला तयार नाही.

हिलटॉप कंपनीत 70 स्‍थानिक युवा कामगार हेल्‍पर म्‍हणुन काम करताहेत. परप्रांतीय कामगारांना 30 दिवस तर स्‍थानिकांना केवळ 18 दिवसच काम दिले जात आहे. महीन्‍यातुन किमान 26 दिवस काम द्यावे अशी मागणी लावुन धरत आंदोलकांनी खानबंद आंदोलनाचे हत्‍यार उपसले आहे. कामगारांच्‍या न्‍याय हक्‍काकरीता बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्‍यात आले असुन मागण्‍या मान्‍य होत नाही तो पर्यंत कोलारपिंपरी कोळसा खाणीतील कामकाज बंदच राहील अशी माहीती आंदोलनकर्त्‍यांनी दिली आहे.

कामबंद आंदोलनामुळे कोलार पिंपरी कोळसा खाणीतील कोळसा उत्‍पादन तसेच ओबी डंम्‍पींगचे कामकाज आंदोलकांनी बंद पाडले होते. याचा फटका वेकोलीला मोठया प्रमाणात बसला आहे. दोन दिवसात वेकोलीचे जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविण्‍यात येत आहे. मुख्‍य खान प्रबंधक नेमकी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 
Rokhthok News