Home Breaking News ‘मॅकरून’ शाळेचे बांधकामच अनधिकृत..!

‘मॅकरून’ शाळेचे बांधकामच अनधिकृत..!

● जमीन मालकाला पालिकेची नोटीस, काम त्वरित थांबवण्याचा इशारा.....!

C1 20260330
IMG 20260522 WA0013

जमीन मालकाला पालिकेची नोटीस, काम त्वरित थांबवण्याचा इशारा…..!

Big News : गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरातील “मॅकरून स्टुडंट अकादमी” शाळे करिता नवीनतम इमारतीचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. संबंधित ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच पालिका मुख्याधिकाऱ्यांनी बांधकामधारकाला थेट नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. Construction of ‘Macaroon’ school is unauthorized..!

धनदांडग्यांच्या दावणीला बांधलेल्या पालिका प्रशासनाने प्रशासकीय कार्यकाळात अनधिकृत बांधकामाला मूकसंमती दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील दोन वर्षांपासून शहरातील मोक्याच्या ठिकाणी होत असलेले अवाढव्य अनधिकृत बांधकाम प्रशासनाला दिसू नये हा संशोधनाचा विषय झालेला आहे.

IMG 20260511 WA0005

गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात शालेय इमारत निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या अनधिकृत बांधकामाबाबत नगरसेवक सुधीर थेरे यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गोरगरीबांच्या बांधकामावर कारवाई करण्याची तत्परता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी या धनदांडग्यांच्या इमारतीवर बुलडोझर चालवावा अशी मागणी केली आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना भविष्यात जरब बसेल अशी कठोर कारवाई अपेक्षित असल्याचे मत थेरे यांनी व्यक्त केले आहे

Img 20250103 Wa0009

मुख्याधिकारी यांनी जागेचे मूळ मालक प्रिया अभिनव भास्करवार यांना नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच बांधकाम परवानगी, नकाशा, लेआऊट नकाशा, मोजणी शीट, आखीव पत्रिका, सात बारा, खरेदी-विक्री खत, चालू आर्थिक वर्षाची कर पावती, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, शाळा संचालीत करण्याबाबतचे प्रमाणपत्र, अग्निशमन विभागानचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच जागा मालकी हक्का संबंधी सर्व कागदपत्रे सादर करावे व अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवावे अशी ताकीद दिली आहे.

व्यावसायिक इमारतीच्या अनधिकृत बांधकामाने शहरात खळबळ उडाली असून नगरपरिषदेच्या ठोस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत बांधकामांवर प्रशासन खरंच कठोर पाऊल उचलणार का, की पुन्हा एकदा कारवाई फक्त कागदावरच राहणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ROKHTHOK

Previous articleपर्समधून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास
Next articleअपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.