Home क्राईम पर्समधून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

पर्समधून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

● वरोरा- वणी प्रवासादरम्यानची घटना

C1 20260326
IMG 20260522 WA0013

वरोरा- वणी प्रवासादरम्यानची घटना

Crime News : लग्न सोहळ्यासाठी अकोला येथून आलेल्या महिलेची वरोरा- वणी प्रवासादरम्यान बस मधून सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. पाच तोळ्यांच्या आसपास सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Five tolas of gold ornaments stolen from purse

अर्चना रमेश कोल्हे (46) असे महिलेचे नाव असून त्या बलोदे लेआऊट, शारदा नगर, हिंगणा रोड, अकोला येथील निवासी आहेत. त्या आपल्या पतीसमवेत नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी 19 मार्च रोजी अकोला येथून नवजीवन एक्सप्रेसने प्रवास करत वरोरा येथे उतरल्या. तेथून ऑटोने बसस्थानक गाठून पुढे त्या चंद्रपूर–राळेगाव बस मध्ये बसून वणी येथे दुपारी पोहचल्या. या दरम्यान चोरट्याने पर्स मधील सोन्याचे दागिने लंपास केले.

IMG 20260511 WA0005

वणी बसस्थानकात उतरल्यावर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्सची चेन उघडी असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता पर्समधील सोन्याचे विविध दागिने अंगठ्या, गोफ, मंगळसूत्र व कानातील ऐवज असे एकूण 47 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी लगेचच वणी येथील नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठले.

Img 20250103 Wa0009

पोलिसांनी मौखिक तक्रार ऐकून घेतली मात्र घटनेच्या दिवशी गुन्हा नोंदवून घेतला नाही तर शोधाशोध करण्याचे आश्वाशीत केले. चिखलगाव येथून 20 मार्चला ‘बोरवन’ बेला जि. अदिलाबाद राज्य तेलंगणा येथे जाणार असल्याने त्या लग्न सोहळ्याला निघून गेल्या. 21 मार्च चे लग्न आटोपल्यावर त्यांनी पुन्हा वणी पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी 23 मार्चला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
Rokhthok