कळंब | तालुक्यातील कामठवाडा येथे घरगुती वादातून जावयानेच सासूला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना 19 जुलै ला घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल सुरेशराव धोत्रे (30) असे गुन्हा नोंद झालेल्या जावयाचे नाव आहे. तो तळेगाव (ठाकूर तिवसा) येथील निवासी आहे. कामठवाडा येथे वास्तव्यास असलेल्या सासू माला हरिभाऊ चौधरी यांना घरगुती कारणावरुन शिवीगाळ केली व मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भाच्याला सुध्दा मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.