Home Breaking News शिवपुराण कथेसाठी उसळणार भाविकांचा जनसागर

शिवपुराण कथेसाठी उसळणार भाविकांचा जनसागर

● तयारी पुर्णत्‍वाकडे, आयोजन समिती सज्‍ज

C1 20240124 16242128
तयारी पुर्णत्‍वाकडे, आयोजन समिती सज्‍ज

Mhashivpuran News Wani : वणी शहरात अभुतपुर्व, न भुतो न भविष्‍यती असे श्री शिवपुराण महाकथेचे आयोजन करण्‍यात आले आहे. जग प्रसिध्‍द कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे मधुर वाणीतुन सुश्राव्‍य कथेचा आनंद घेण्‍यासाठी लाखो भाविक भक्‍तांचा जनसागर उसळणार आहे. महाकथेचे आयोजन 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले असले तरी कोणत्‍याही भाविक भक्‍तांना ञास होवू नये याकरीता आयोजन समिती सज्‍ज झाली आहे. Lakhs of devotees will flock to enjoy the melodious story in the melodious voice of storyteller Pradeep Mishra.

C1 20240124 17114581
पत्रकार परिषद

श्री काशी शिवपुराण कथा आयोजन समितीने कथास्‍थळी बुधवार दिनांक 24 जानेवारीला दुपारी पञकार परिषद घेत विस्‍तृत माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख आयोजक राजकुमार जयस्‍वाल, श्रध्‍दा राजकुमार जयस्‍वाल यांनी “आपण सर्व वणीकर या श्री शिवपुराण महाकथेचे आयोजक आहात” असे विनम्रपुर्वक स्‍पष्‍ट केले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे नेते राजु उंबरकर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे,  निकेत गुप्‍ता, अनिल पाटील, पम्‍मा सेठ, सुधीर साळी यांची उपस्थिती होती.

आयोजन समितीने या कार्यक्रमाबाबतचे आयोजन,  नियोजन आणि भाविक भक्‍तांबाबची कटीबद्धता कथन केली. दररोज पन्‍नास ते साठ हजार भाविकांच्‍या दोन वेळच्‍या जेवनाची व चहाची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट केले. या भव्य सभामंडपात महिला व पुरुषांना एकत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल लावण्यात येणार आहे. तात्काळ सेवेसाठी वैद्यकीय व अग्निशमन दल कथास्थळी ठेवण्यात येणार असल्‍याचे सांगीतले.

Img 20250103 Wa0009

या महत्‍वपुर्ण कार्यासाठी 30 वेगवेगळ्या समित्या बनविण्यात आलेल्या असून यात 140 जणांची मुख्य सूत्रधार समिती बनविण्यात आली आहे. या माध्यमातून 1400 पेक्षा अधीक सेवक सेवा देणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा दृष्टीकोनातून 50 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. सर्व भाविकांना प्रत्यक्ष कथा ऐकण्याची संधी मिळावी यासाठी 12 एलईडी वॉल लावण्यात येणार असल्‍याचे सांगीतले.

पञपरिषदेत बोलतांना आ. बोदकुरवार म्‍हणाले की, एवढया मोठया कार्यक्रमांत काही ञृटया आढळल्‍या तर सांगाव्‍यात,  त्‍या पूर्णत्वास नेण्‍यात येईल परंतु आकसबुध्‍दीने अपप्रचार करु नये असे प्रखर मत मांडले तर मनसे नेते राजु उंबरकरांनी संपुर्ण कार्यक्रमाची रुपरेषा आणि भव्‍यदिव्‍य आयोजनात सहकार्य करण्‍याचे आवाहन केले. यावेळी तारेंद्र बोर्डे यांनी सांगीतले की लाखो भाविकभक्‍त येणार आहेत. ते आपले पाहुने आहेत त्‍यांचे आदरातिथ्‍य करण्‍याची आपली संस्‍कृती आहे यामुळे त्‍यांना कोणताही ञास होवू नये याची काळजी घ्‍यावी असे वणीकरांना सांगीतले.

महाकथेच्या पूर्वसंध्येला भव्‍य शोभायाञा
शुक्रवार दिनांक 26 जानेवारीला श्री काशी शिवपुराण कथा आयोजन समितीच्‍या वतीने वणीकर नांगरीकांना कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे दर्शन व्‍हावे याकरीता भव्‍य शोभायाञेचे आयोजन केले आहे. नांदेपेरा मार्गावरुन शोभायाञेला सुरवात होणार असुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करत टिळक चौकात भव्‍य जल्‍लोष, फटाक्‍याची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर करण्‍यात येणार आहे. तसेच दिल्‍ली येथील शिवतांडव करणारे पथक या शोभायाञेत असतील असे आयोजकांनी सांगीतले.
Rokhthok News