Home Breaking News SHIVSENAUBT : नांदेकरांनी डागली देरकरांवर आरोपांची “तोफ”

SHIVSENAUBT : नांदेकरांनी डागली देरकरांवर आरोपांची “तोफ”

● भगव्या सप्ताहात गद्दाराचा सत्कार ● जिल्‍हा संपर्क प्रमुख करताहेत गटबाजी

653
C1 20240808 10324890

भगव्या सप्ताहात गद्दाराचा सत्कार
जिल्‍हा संपर्क प्रमुख करताहेत गटबाजी

Political News | भगवा सप्ताहच्या दरम्यान शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्यावर आरोपाची तोफ डागली. तर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड गटबाजीला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. यावेळी संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. Various activities are being implemented under the leadership of District Head and former MLA Vishwas Nandekar.

Img 20250422 wa0027

पक्ष प्रमुखांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पक्ष सदस्य नोंदणी, विभागवार मेळावे, बुथप्रमुख, गटप्रमुखांचे मेळावे, युवक व युवती साठी विविध स्पर्धाचे आयोजन तसेच नविन शाखा बांधणी करण्यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड यांनी देरकर यांना हाताशी धरून पुर्णतः गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. टागौर चौकात देरकर यांनी शाखा फलकाचे अनावरण केले. त्यामध्ये दोन्ही उप जिल्हाप्रमुखांचे नाव नसल्याचे स्पष्ट करत शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, यांच्या नेमणुका करण्याच्या अधिकार फक्त तालुका प्रमुख, शहर प्रमुख व जिल्हाप्रमुख यांनाच आहे. तो अधिकार देरकरांना कोणी दिला असा घणाघाती आरोप नांदेकरांनी केला.

वणी विधानसभा क्षेत्रात गटबाजीचे दर्शन होत आहे. भगवा सप्ताहाच्या निमित्ताने देरकर यांनी जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आयोजित केला होता. या प्रसंगी पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या गद्दाराचा सुध्दा सत्कार करण्यात आल्याचा आरोप नांदेकरांनी केला आहे. तसेच शिंदे गटाचे सहाय्यक संपर्क प्रमुख राजुदास जाधव यांच्या जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी देरकर यांच्या सौभाग्यवती विराजमान असल्याचा स्फोटक दावा यावेळी करण्यात आला.

वणी मतदारसंघ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुटेल अशी चर्चा रंगत असतानाच पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरिता शिवसेना जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर, उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे व वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी दावा केला आहे. परंतु पक्षांतर्गत गटबाजी क्षमवण्याचे काम पक्षश्रेष्ठींचे आहे.

पत्रकार परिषदेत वणी विधासभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर, जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महिला जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख चंद्रकांत घूग्गुल, संजय आवारी, सीमा विशाल आवारी, सुरेखा भोयर, वनिता काळे, सुधीर थेरे, अभय चौधरी, भाग्यश्री वैद्य, सपना केलोदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पक्षात गटबाजी खपवुन घेतल्‍या जाणार नाही. यावर पक्षश्रेष्‍टी काय तो निर्णय घेणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्‍याच वाट्याला येणार असुन पक्ष प्रमुख ठरवेल त्‍या उमेदवाराचे काम शिवसैनिक करतील.
विजयानंद पेडणेकर
वणी विधानसभा संपर्क प्रमुख, मुंबई
Rokhthok News