● भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती
Big News : वणी लगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे सोमवारी रात्री भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. इतिहासात प्रथमच भूकंपाची नोंद झाल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने स्पष्ट केले. रात्री 9 वाजून 23 मिनिटाने ही घटना घडली. याबाबत भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी माहिती दिली. Earthquake: Warora shook, 3.2 on Richter scale

वरोरा तालुक्यात शेकडो वर्षांपासून कधीही भूकंप झाले नव्हते. येथील जमिनीखाली कोळसा आणि स्तरीत खडक असल्याने भूभाग तुलनेने स्थिर मानला जात होता. मात्र अलीकडील काळात कोळसा खाणींमधील खोदाई व खाणींच्या खोल भागात शिरलेले नदीचे पाणी यामुळे “हायड्रो-सिस्मोलॉजी” घडली असल्याचे स्पष्ट केले.
या वर्षी पडलेला अतिवृष्टीजन्य पाऊस व खाणींच्या खोल भागात शिरलेले पाणी यामुळे अंदाजे 3 ते 4 किमी खोलीत पाण्याच्या प्रवाहाने भूपट्ट सरकल्याने हा भूकंप झाल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. सुदैवाने, भूकंप किरकोळ असल्याने नागरिकांना विशेष त्रास झाला नाही. मात्र प्रा. चोपणे यांनी पुढील काही वर्षांत अशा प्रकारचे भूकंप वारंवार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशारा दिला आहे.
ROKHTHOK






