● शनिवारी रात्री भीषण अपघात
Sad News :
मारेगाव शहरातील तुळशीराम बार अँड रेस्टॉरंट समोर शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वणीहून दुचाकीने मारेगावकडे जात असलेल्या तरुण–तरुणीला समोरून आलेल्या भरधाव आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. Eicher vehicle crushes two-wheeler, two killed
गौरव बापुराव आत्राम (23), रा. गौराळा (ता. मारेगाव) व नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (17), रा. बोपापूर (कायर) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री अंदाजे 8 वाजताच्या सुमारास गौरव आपल्या स्कुटीवरून नमेश्वरीला घेऊन वणीकडून मारेगावकडे येत होता. तुळशीराम बारसमोर पोहोचताच समोरून येणाऱ्या एका भरधाव आयशर वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की स्कुटी काही मीटरपर्यंत फरफटत गेली व ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आयशर वाहनचालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून थेट मारेगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
Rokhthok






