Home Breaking News आमदार देरकरांनी शासनाला विचारला “जाब”

आमदार देरकरांनी शासनाला विचारला “जाब”

● अवैध उत्खनन आणि प्रदूषणावर विधानसभेत चर्चा

C1 20250703 19541158
अवैध उत्खनन आणि प्रदूषणावर विधानसभेत चर्चा

Political News :
वणी तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी क्रशरच्या माध्यमातून गौण खनिज उत्खनन यामुळे निर्माण झालेले प्रदूषण, धोक्यात आलेले मानवी आरोग्य आणि शेतपिकांची नष्ट झालेली उत्पादन क्षमता याविषयी आमदार संजय देरकर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. महत्वपूर्ण मुद्द्याला वाचा फोडत पावसाळी अधिवेशनात शासनाला “जाब” विचारला. MLA Sanjay Dekar raised the question in the monsoon session.

मोहदा परिसरात चालू असलेले गौण खनिजांचे अवैध उत्खनन, त्यातून दररोज हजारो अवजड वाहनांची बेजबाबदार वाहतूक आणि यामुळे होणारे धूलिकण प्रदूषण हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला आणि शेतपिकांच्या उत्पादन क्षमतेला गंभीर धक्का पोहोचवत आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून, उत्पादन घटल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

C1 20260430

आ. देरकर म्हणाले की, “वणी उपविभाग हा कोळसा, डोलामाईट, चुनखडी, सिमेंट दगड अशा मौल्यवान खनिजसंपत्तीने समृद्ध असतानाही प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा भाग नियमबाह्य खनिज उत्खननाचा अड्डा बनला आहे.” महसूल विभागाकडून अनेकांना खानपट्टे वाटप झाले असून, उत्खनन प्रक्रिया नियमबाह्यरीत्या चालत असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

Img 20250103 Wa0009

खनिकर्म विभाग, पर्यावरण नियंत्रण मंडळ तसेच पोलीस प्रशासन यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असून, स्थानिकांच्या तक्रारींनंतरही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदारांनी केला. “घटना घडल्यानंतर यंत्रणा गप्प बसते, पण तत्पूर्वी काहीही कारवाई होत नाही,” असा आरोप त्यांनी केला.

या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आमदार देरकर यांनी शासनाने तत्काळ कारवाई करून अवैध उत्खनन रोखावे, अवजड वाहनातून होणारे बेजबाबदार दळणवळण थांबवावे, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. याप्रकरणी शासन काय निर्णय घेतात याकडे स्थानिक पीडित जनतेचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News

Previous articleसराईत गुन्हेगार “साहिल” तडीपार
Next articleशाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ…!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.