● कल्पक आणि कलात्मक हारच खरे आकर्षण
Wani News | उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या आभार दौऱ्यात स्वागतासाठी कापसापासून निर्मित भव्य हार खरे आकर्षण ठरले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी 30 फूट भव्य हार वणीतील माऊली क्रिएशनच्या (8788746775) कलावंतांकडून तयार केला. During the thanksgiving tour, the grand garland made of cotton was a real attraction
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा आभार दौरा गुरुवारी यवतमाळला संपन्न झाला. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला भरभरून मते देत सत्तेत बसविले. याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. जिल्ह्यात कापसावर आधारित प्रकल्प व्हावे हा उद्देश बाळगत कापसाचा हार स्वागतासाठी आयोजकांनी वापरला आहे.
माऊली क्रिएशन सातत्याने नानाविध क्रिएटिव्ह कलात्मक वस्तूची निर्मिती करतात. “कोणताही क्रिएटिव्ह उपक्रम आम्ही हाती घेतो” हे ब्रीद त्यांचे आहे. त्यांनी कापसाचा उत्कृष्ठ हार तयार केला. यासाठी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेला साकार करत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री विद्यमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे स्वागत केले. आभार यात्रेत यवतमाळ मधील कापसाचा हार खरे आकर्षण ठरल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News






