Home Breaking News वृद्धांची नदीत उडी मारून आत्महत्या

वृद्धांची नदीत उडी मारून आत्महत्या

● आजारपणाला वैतागल्याने केले कृत्य

आजारपणाला वैतागल्याने केले कृत्य

Wani News | तालुक्यातील कळमना येथे वास्तव्यास असलेल्या 75 वर्षीय वृद्धाने पुलावरून पैनगंगा नदीत उडी मारली. ते आजारपणाला वैतागल्याने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात असून ही घटना गुरुवार दि 20 जुलैला दुपारी उघडकीस आली. It is said that he committed suicide due to frustration with the illness.

गणपत शिवराम बोरकर (75) असे मृतक वृद्धांचे नाव आहे. ते कळमना येथील निवासी होते घटनेच्या एक दिवसापूर्वी ते घरून निघून गेले होते. त्यांनी नदीत उडी मारल्याचा संशय पारिवारिक मंडळींना आला. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठत शोध कार्य आरंभले. टाकळी शिवारातील नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009