Home Breaking News कोळसा खाणीत जखमी झालेल्या टिप्पर चालकाचा मृत्यू

कोळसा खाणीत जखमी झालेल्या टिप्पर चालकाचा मृत्यू

कोलरपिंपरी कोळसा खाणीतील घटना

रोखठोक | कोलरपिंपरी कोळसा खाणीत मातीकाम करणाऱ्या हिलटॉप कंपनीतील टिप्पर चालक कर्तव्य बजावताना टिप्पर मधून खाली पडला. त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सेवाग्राम येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

उमेश शहा असे मृतकाचे नाव आहे तो हिल टॉप कंपनीत टिप्पर चालक म्हणून कर्तव्यावर होता. कोळसा खाणीत सुरक्षिततेच्या अभावामुळे अपघात वाढले आहेत. कामगारांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. मागील महिन्यात सुरक्षा सप्ताहाच्या पूर्वसंध्येला पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता.

कोळसा खाणीत उत्खनन झालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी वेकोलीच्या अधिनस्त माती कंपन्या कार्यरत आहे. हिल टॉप या कंपनीतील टिप्पर चालक उमेश शहा हा शुक्रवार दि.20 जानेवारीला पहाटे 2 वाजताच्या दरम्यान टिप्पर मधून खाली उतरत असताना खाली पडला. त्याला जबर मार लागला, अन्य कामगारांनी त्याला वणीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सेवाग्राम येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
वणी : बातमीदार

Img 20250103 Wa0009