Home Breaking News Suicide : विषाचा घोट, ईसमाची आत्महत्या

Suicide : विषाचा घोट, ईसमाची आत्महत्या

● डॉक्टरांनी मृत घोषित केले

1310
C1 20240816 07523261

डॉक्टरांनी मृत घोषित केले

Sad News | तालुक्यातील बेसा (लाठी) येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने विषाचा घोट घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट ला सकाळी उघडकीस आली असता त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. A 40-year-old man ended his life by ingesting poison.

Img 20250422 wa0027

विकास दामोदर देवतळे (40) असे मृतकाचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह बेसा येथे राहत होते. घटनेच्या दिवशी गुरांच्या गोठ्यात बसून विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना लक्षात आली असता त्यांनी विकासला सकाळी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती विकासला मृत घोषित केले.

Img 20250103 Wa0009

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली व उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News