Home Breaking News दुःखद ..विष प्राशन करून संपवले जीवन

दुःखद ..विष प्राशन करून संपवले जीवन

● खैरगाव (बुटी) येथील घटना

C1 20251107

खैरगाव (बुटी) येथील घटना

Sad News :
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बुटी) येथे 48 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबरला सायंकाळी उघडकीस आली. गुणवंता अजाब कुमरे असे मृतकाचे नाव असून तो त्याचे हिस्स्यावर आलेल्या 4 एकर शेत जमिनीच्या भरवशावर परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. Farmer ends life by consuming poison

गुरुवारी सायंकाळी भोलेनाथ कुमरे यांच्या शेताजवळ कोणीतरी पडलेले असल्याची माहिती मृतकाच्या चुलत भावाला मिळाली. त्यांनी तडक घटनास्थळी धाव घेतली. तेथे गुणवंता बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्याचवेळी गावातील मंगेश ऊईके, मंगेश ठमके, मुन्ना ठाकुर, कुणाल कुमरे व देविदास कुमरे तेथे पोहचले.

ग्रामस्थांनी गुणवंता यांना वाहनाची व्यवस्था करून तत्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मारेगाव पोलिसांना माहिती मिळताच जमादार दिगंबर किनाके यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतकऱ्याच्या मृत्यूने परिवार उघड्यावर आला आहे.
Rokhthok

Img 20250103 Wa0009