Home Breaking News Accident | यवतमाळ मार्गावर भीषण अपघात, एक ठार

Accident | यवतमाळ मार्गावर भीषण अपघात, एक ठार

● मारेगाव जवळ दोन दुचाकी भिडल्या

C1 20231026 21564305

मारेगाव जवळ दोन दुचाकी भिडल्या

Accident News | वणी-यवतमाळ मार्गावरील मारेगाव लगत असलेल्या मांगरूळ शिवारात दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. A 25-year-old youth died while two others were seriously injured

Img 20250103 Wa0009

हितेश संजय पारखी (25) असे मृतकाचे नाव आहे, तो मारेगाव तालुक्यातील मदानापूर येथील निवासी होता. तर या अपघातात राघो चांदबा कोरझरे (57) व मोहन बापुराव मजगवळी (40) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत ते मांगरूळ येथील आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.

गंभीर जखमी झालेले व्यक्ती कामानिमित्त मारेगावला गेले होते. ते परतीच्या मार्गावर होते आणि त्याच वेळी वणी कडून येत असलेल्या दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. अपघात भयंकर होता, स्थानिकांनी तातडीने जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. या अपघातातील एक दगावला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटने बाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे.
Rokhthok News