Home Breaking News अपघातात दोन वेकोलि कर्मचारी गंभीर जखमी

अपघातात दोन वेकोलि कर्मचारी गंभीर जखमी

● दोघांच्याही पायाचा अक्षरशः चुराडा

C1 20250731 13012050

दोघांच्याही पायाचा अक्षरशः चुराडा

Sad News : वणी तालुक्यातील वेकोलि वसाहत कैलास नगर येथे वास्तव्यास असलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला ट्रक ने जबर धडक दिली. या धडकेत दोघांच्याही पायाचा अक्षरशः चुराडा झाला. त्यांना तात्काळ नागपूर येथील मॅक्स रुग्णालयात हलविण्यात आले. ही भयावह घटना बुधवार दिनांक 30 जुलैला रात्री 9:30 वाजता घुग्गुस येथील शिवाजी चौकात घडली. Fatal accident: Two WCL employees seriously injured

संजय पाल व उद्धव मोरे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेकोलि कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पाल हे मुंगोली तर मोरे हे वेकोलिच्या कोलगाव कोळसा खाणीत कर्तव्यावर आहेत. तसेच त्यांचे वास्तव्य वेकोलि वसाहत कैलास नगर येथे आहे.

घुग्गुस येथील शिवाजी चौकातील अतिक्रमण आणि वाहतूक अराजकतेमुळे बुधवारी रात्री एक गंभीर अपघात घडला. रात्री 9.30 च्या सुमारास चंद्रपूरकडे जात असलेल्या TG-29-T-2969 क्रमांकाच्या ट्रकने मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन वेकोलि कर्मचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांच्याही पायाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

Img 20250103 Wa0009

अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News