
● सौम्य, मितभाषी व सोज्वळ स्वभावाचे विनोद मुत्यलवार काळाच्या पडद्याआड
Sad News
वणी शहरातील कनकवाडी येथील रहिवासी व शिवतीर्थ कॉम्प्लेक्स, टिळक चौक येथे सायकल व मोटारसायकल रिपेअरिंगचे दुकान चालवणारे विनोद गोविंदराव मुत्यलवार (वय 53) यांचे मंगळवार, दिनांक 22 जुलै रोजी पहाटे पंचमढी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. A businessman from Wani who went to Pachmarhi for darshan of God dies of heart attack
विनोद मुत्यलवार यांचा स्वभाव सौम्य, मितभाषी व सोज्वळ असल्यामुळे परिसरात त्यांचा चांगला संपर्क व सुसंवाद होता. ते आपल्या मुलासह पंचमढी येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणीच पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मोठा आप्तस्वकीय गोतावळा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. विनोद मुत्यलवार यांच्या निधनाने एक प्रामाणिक व मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)






