Home Breaking News पाच वर्षांच्या बालकाने मन जिंकलं “भावा”

पाच वर्षांच्या बालकाने मन जिंकलं “भावा”

● अर्णव अजहर चिनी चे प्रबोधन

C1 20241008 22124732
Img 20250910 wa0005

अर्णव अजहर चिनी चे प्रबोधन

Wani News | शहरात दांडियाची धूम सुरू आहे, तरुण तरुणी रास गरबात तल्लीन झालेल्या आहेत. मोठया उत्साहात साजरा होत असलेल्या या रंगारंग महोत्सवात एका बालकाने खरंच मन जिंकलं भावा. त्याचे नाव अर्णव अजहर चिनी असून दररोज वेगवेगळे स्लोग्न हाती घेऊन समाज प्रबोधन करत आहे. Arnav Azhar Chini and is awakening the society by taking up different slogans every day.

Img 20250103 Wa0009

वणी शहरात दांडिया नृत्याची धूम सुरू आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुळसंगे व जनहित संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा आयोजित राजे गरबा उत्सवात त्या बालकाने हातात बॅनर घेत उत्कृष्ट संदेश दिला आहे या प्रबोधनात्मक संदेशाने उपस्थितांचे मन भारावून गेले आहे.

“कुछ ना चढाओ नवरात्री में माँ की थाली में,
पर याद रहे, माँ शब्द ना चढे किसी भी गाली में” त्या बालकाने सुरुवाती पासूनच प्रत्येक दिवशी हातात बॅनर घेत केलेले प्रबोधन कौतुकास्पद आहे. मात्र त्या बालकांच्या प्रबोधनाची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rokhthok News