Home क्राईम क्षुल्लक वाद.. तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

क्षुल्लक वाद.. तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

● वणी पोलिसात गुन्हा दाखल

C1 20241007 18462988
IMG 20260522 WA0013

वणी पोलिसात गुन्हा दाखल

Crime News | शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोकेवर काढले आहे. पोलिसांची पोलिसिंग संपुष्टात आली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवार दिनांक 7 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान एकता नगर परिसरातील सुलतान बिर्याणी हॉटेल समोर दोघांनी धारदार शस्त्राने हॉटेल मॅनेजर वर हल्ला चढवला. या घटनेत 23 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. Crime trend has taken a head in the city.

निकेश विठ्ठल होले राहणार काजीपुरा व चेतन चिकटे एकतानगर असे हल्ला चढवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या एक दिवसापूर्वी रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास सुलतान बिर्याणी हॉटेलचा मॅनेजर मो. रजा मो. वसिर रंगरेज हा हॉटेल बंद करून जात असताना एकता नगरच्या बोर्डा जवळ आरोपीने अडवले व विनाकारण वाद घातला. ते दोघे नशेत असल्याने त्यांना उद्या बोलू असे म्हणून मो. रजा मो. वसिर रंगरेज हा तेथून निघून गेला.

IMG 20260511 WA0005

सोमवारी दुपारी 12 वाजता आरोपी निकेश व चेतन हे दोघे दुचाकीने हॉटेल सुलतान बिर्याणी समोर आले. त्यांनी रात्री घडलेल्या वादावर बोलण्यास सुरुवात केली तसेच माफी मागण्यास सांगितले. तेवड्यात शर्ट च्या आत ठेवलेला चाकू काढला व हल्ला चढवला यात पाठीवर जखम झाली आहे. अचानक घडलेल्या प्रकारामुळे जखमी तरुणाने आरडाओरडा केला. त्याचवेळी त्याचा मामा सिद्धीक रंगरेज धावत आला व आरोपीला पकडले आणि त्यांचेजवळील शस्त्रासह पोलिसांच्या स्वाधीन केले.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस 2023 कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 3(5), शस्त्र अधिनियम 4 व 25 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. सण उत्सवाचे दिवस आहे, शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावू नये याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News