Home Breaking News माजी आमदारांचे “फॉरचूनर” वाहन फोडले

माजी आमदारांचे “फॉरचूनर” वाहन फोडले

● दोन लाख रुपयांचे नुकसान

1758
C1 20250616 11554194

दोन लाख रुपयांचे नुकसान

Rokhthok News |
झरी जामनी तालुक्यातील दुर्भा येथे ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीवरून वाद झाला. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांचे “फॉरचूनर” वाहन शेतात उभे होते. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असता संशयित आरोपीने कुऱ्हाडीच्या साह्याने वाहनाची तोडफोड करण्यात आली.यात सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. Former MLA’s “Fortuner” vehicle vandalized

सचिन भिमराव पंचरे (35) रा. दुर्भा यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची 14 एकर शेती 2025 ते 2026 या वर्षासाठी वार्षिक 70,000 रुपये दराने तीन वर्षांसाठी ठेक्याने घेतली आहे. यासाठी त्यांच्याकडे अधिकृत पोचपावती आहे. पेरणीसाठी ते आपल्या मालकाच्या MH29BP0505 या क्रमांकाच्या वाहनासह शेतात गेले होते.

Img 20250103 Wa0009

यावेळी गावातील पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण शेतात येऊन त्यांनी शेतीवर दावा करत पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. “हे शेत आमचे आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका,” असे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन यांनी जिल्हा परिषद शाळेच्या ठेक्याची माहिती दिली. मात्र, वाद वाढत गेला आणि पेंन्टना यांनी हातातील कुऱ्हाडीने वाहन फोडले.

दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात कलम 125, 329(3), 126(2), 324, 351, 352 अंतर्गत तसेच BNS 3(5) 2025 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News

गळफास लावून कामगाराची आत्महत्या