Home Breaking News Goutami Patil : दिलखेचक अदा आणि घायाळ तरुणाई

Goutami Patil : दिलखेचक अदा आणि घायाळ तरुणाई

● पोलीस आणि बाऊनसर यांची उडाली तारांबळ ● प्रचंड माहोल, चेंगड करणाऱ्यांना चोप

1981
C1 20231230 00171271

पोलीस व बाऊनसर यांची उडाली तारांबळ
प्रचंड माहोल, चेंगड करणाऱ्यांना चोप

सुनील पाटील : प्रसिध्‍द नृत्‍यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील यांची दिलखेचक अदा आणि घायाळ तरुणाई यावेळी बघायला मिळाली. प्रचंड माहोल, थिरकणारे तरुण, चाललेली चेंगड यामुळे पोलीस आणि बाऊनसर यांची चांगलीच तारांबळ उडाली. A valiant program of dance by renowned dancer Gautami Patil was organized

Img 20250422 wa0027

ऍड. कुणाल विजय चोरडीया यांचे अध्‍यक्षतेखाली T-10 चॅम्पियन्‍स लीगचे आयोजन करण्‍यात आले आहे. या निमीत्‍ताने 29 डिसेंबरला प्रसिध्‍द नृत्‍यांगना गौतमी पाटील यांच्या बहारदार नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वणी व परिसरातील नागरिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवली.

Img 20250103 Wa0009

C1 20231230 00181889

गौतमी पाटील यांच्या संचानी नृत्याला सुरवात करताच तरुणाई बेभान झाली होती. तो जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि “पाटलाचा बैल गाडा” पर्यंत असणारा नृत्याचा प्रवास अक्षरशः प्रेक्षकांना चेतवणारा होता. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप सुध्दा दिला.

C1 20231230 00190689

पारसमल प्रेमराज ज्‍वेलर्स प्रस्‍तुत T-10 चॅम्पियन्‍स लीगचे सामने आयोजीत करण्‍यात आले आहे. या निमीत्‍ताने शुक्रवारी प्रमुख आकर्षण व T-10 चॅम्पियन्‍स लीगचे उद्घाटन गौतमी पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रथमतः सर्व सहभागी संघाचा परिचय करून देण्यात आला.

जिल्ह्यात प्रथमच गौतमी पाटील यांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. त्यातच आयोजन समितीने मोठया प्रमाणात बाऊनसर तैनात केले होते. प्रचंड गर्दी, मोठया प्रमाणात तरुण आबालवृद्ध आणि महिला गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
Rokhthok News