● बोदकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश
BIG NEWS :
पालिका प्रशासनाने मोठया प्रमाणात करवाढ केली होती. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले होते. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. परिणामी वणी नगर परिषदेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या सन 2025–26 ते 2028–29 या कालावधीतील चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनास स्थगिती देण्यात आल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. Tax hike postponed, government provides relief to the public
या निर्णयामुळे वणीतील नागरिकांवरील मोठा आर्थिक भार कमी झाला आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या निर्णयाला यश मिळाले आहे. पालिकेकडून काही दिवसांपूर्वी नागरिकांना पाठविण्यात आलेल्या नोटिसांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या करापेक्षा 3 ते 6 पट अधिक करवाढ प्रस्तावित करण्यात आली होती.
संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या तरतुदींच्या विरोधात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजपने तातडीने कारवाई केली. 13 ऑक्टोबरला माजी आमदार बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना सांगितल्या. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश जारी केले असून नगर परिषद वणीला याबाबत कळविण्यात आले आहे.
निर्णयानंतर माजी आमदार बोदकुरवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी आमदार नसतानाही वणीकर जनतेसाठी सदैव कार्यरत राहणार असून जनतेवर कदापिही अन्याय होऊ देणार नाही असे मत व्यक्त केले. या दिलासादायक निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीकर जनतेच्या वतीने आभार सुध्दा मानले”
Rokhthok






