Home Breaking News भीषण अपघातात तिघींचा मृत्यू, दोघे गंभीर

भीषण अपघातात तिघींचा मृत्यू, दोघे गंभीर

● ट्रक-चारचाकीची वाहनांची जबर धडक

C1 20251031 12582310

ट्रक-चारचाकीची वाहनांची जबर धडक

SAD NEWS :
शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान लालगुडा परिसरात ट्रक आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. महामार्गावरून स्कोडा वाहन चालवणाऱ्या तरुणीने अचानक यु टर्न घेतल्याने दुर्दैवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. Three dead, two critically injured in horrific accident

प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक MH-01-AH-5700 एक महिला चालवत होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण वसंत गंगाविहार परिसरातील रहिवासी रियाज मिस्त्री यांचा परिवार असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये एका चिमुरडीचा समावेश असून तिची प्रकृती गंभीर आहे.

IMG 20260511 WA0005

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मृतांची नेमकी संख्या व ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ROKHTHOK

Img 20250103 Wa0009