Home Breaking News त्याने…दुपट्ट्याने लावला गळफास

त्याने…दुपट्ट्याने लावला गळफास

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

1308
C1 20240405 14542492
Img 20250630 wa0035

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News : तालुक्यातील चिंचोली येथे वास्तव्यास असलेल्या 42 वर्षीय इसमाने झाडाला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही घटना गुरुवारी घडली असून शुक्रवार दिनांक 5 एप्रिल ला उघडकीस आली. The deceased has been identified as Gajanan Vithuji Satghare and was a resident of Chincholi.

Img 20250630 wa0037

गजानन विठुजी सातघरे (42) असे मृतकाचे नाव आहे ते चिंचोली येथील निवासी होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी गावालगत असलेल्या बांधाजवळील एका झाडाला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास घेतला. गजानन रात्री घरी परतले नाही यामुळे घरच्या मंडळींनी आज पहाटे शोधाशोध केली.

Img 20250103 Wa0009

बांधाजवळील झाडाला गजानन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घरच्या मंडळींनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थ जमा झाले, पोलिसांना कळविण्यात आले. शिरपूर पोलीसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून शव उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News