Home Breaking News तो..व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी..!

तो..व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी..!

● सहा जणांवर खंडणीचे गुन्हे दाखल

C1 20240801 19024252

सहा जणांवर खंडणीचे गुन्हे दाखल

Crime News : शहरातील दीपक टॉकीज परिसरात एका कोंबड्याच्या दुकाना समोर 48 वर्षीय इसम उभा होता. त्यावेळी तिथे पाच तरुण आले त्यांनी “तू दोन नंबरचे धंदे करतो” असे म्हणुन पैशाची मागणी केली व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवार दिनांक 31 जुलैला सायंकाळी घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. The police have registered a case of extortion against six people.

आरीफ रेहमान खलील रेहमान (48) राहणार काळे लेआऊट असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तर सद्दाम उस्मान शेख -रंगनाथ नगर, क्षितीज लायनु इंगळे -रंगनाथ नगर, जुबेर खान अकबर खान-काजीपुरा, फैजल खान फीरोज खान- मोमीनपुरा, अब्दुल फरहान अब्दुल गफ्फार -मोमीनपुरा,फारुख हारुन चिनी सर्व राहणार वणी असे गुन्हे दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

आरीफ रेहमान खलील रेहमान हा दिपक चौपाटी येथे अब्बास याचे कोंबड्याचे दुकाना जवळ उभा होता. त्यावेळी शेख सद्दाम शेख उस्मान हा आपल्या चार साथीदारांसह तिथे आला. त्याने आरिफ याला अश्लील शिवीगाळ केली व माझा बॉस फारुख चिनी याला बोल असे म्हणत फोन आरिफ याचे जवळ दिला. यावेळी चिनी याने “तीन लाख रुपये का दिले नाही” असे म्हणत व्हीडीओ वायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

कोणता व्हिडीओ व्हायरल करणार होते
दीपक चौपाटी परिसरात घडलेला प्रकार अवैद्य व्यवसायातून घडल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. शहरात मोठया प्रमाणात अवैद्य धंदे फोफावले आहेत. मटका, जुगार, कोळसा तस्करी, भंगार व गोवंश तस्करी हे खुलेआम सुरू आहे. पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी ठेवून आहे तर लोकप्रतिनिधी मात्र नेमक्या मटकापट्टीवर धाडसत्र अवलंबताहेत. घडलेल्या या घटनेत काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावेळी परस्परविरोधी शिवीगाळ करण्यात आली, आरोपीने तक्रारकर्त्याची कॉलर पकडुन हातबुक्याने तोंडावर मारहाण केली. तसेच गळ्यातील 9 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत 54 हजार रुपये व खिशात असलेले एक हजार 640 रुपये हिसकावून नेले अशी तक्रार पोलिसात दिली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
Rokhthok News